Viral

Showing of 755 - 768 from 963 results
VIDEO : चक्क रेल्वे क्‍लार्कने चालवली ट्रेन; अधिकाऱ्यांच्या पायाखालची सरकली जमीन

व्हिडीओFeb 1, 2019

VIDEO : चक्क रेल्वे क्‍लार्कने चालवली ट्रेन; अधिकाऱ्यांच्या पायाखालची सरकली जमीन

सूरत, 1 फेब्रुवारी : कुणाच्याही काळजाच ठोका चुकेल अशी घटना गुजरातमधील सूरत येथे घडली आहे. एका रेल्वे क्‍लार्कने चक्क प्रवाशांच्या जीवावर उदार होऊन ट्रेन चालवली. तब्बल 10 मिनिटे त्याने 60 कि.मी. प्रति तास वेगानं गाडी चालवली. ही घटना तेव्हा प्रकाशझोतात आली जेव्हा या घटनेचा VIDEO समोर आला. ट्रेन चालवणाऱ्या क्लार्क हा सूरतच्या आठवा गेट रिजर्वेशन सेंटरमध्ये बुकिंग क्लार्क म्हणून काम करतो आणि त्याचं नाव रविंद्र मोरे असं आहे. इंजीनमध्ये लोको पायलट व्यतिरिक्त कोणीही बसू शकत नाही. असे असताना, एका बुकिंग क्लार्कने एवढी हिंम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेत गाडीच्या लोको पायलटचा निष्काळजीपणा समोर आला आहे. तर, चांगलाच VIRAL झालेला हा VIDEO पाहून रेल्वे अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading