#vinayak

Showing of 27 - 40 from 82 results
शिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा गेलो, पण कधी असं घडलं नाही -विनायक मेटे

व्हिडिओOct 24, 2018

शिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा गेलो, पण कधी असं घडलं नाही -विनायक मेटे

मुंबई, 24 आॅक्टोबर : शिवस्मारकाच्या पायाभरणी करण्यासाठी आम्ही गेलो होते. माझ्यासोबत पत्रकार आणि अधिकारी होती. चार ते पाच बोटीतून आम्ही स्मारकाच्या ठिकाणी निघालो गेलो होतो. मात्र, अचानक एका बोटेला अपघात झाला. खडकाला धडक बसल्यामुळे बोटेचा खालचा भाग कापला गेला. त्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरले आणि बोट बुडाली. पाणी भरल्यामुळे बोटेतील पत्रकारांनी आम्हाला फोन करून सांगितलं. त्यामुळे दुसरी बोट वेळेवर पोहोचली आणि सर्वांना बाहेर काढलं. मात्र, या एक कार्यकर्ता बेपत्ता आहे, त्याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिली. तसंच मी आतापर्यंत शिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा जाऊन आलोय, त्यामुळे तो मार्ग ठरलेला आहे. यावेळी बोटचालकाला याचा अंदाज आला नाही त्यामुळे बोट बुडाली असावी असंही मेटे यांनी सांगितलं. या सर्व घटनेमुळे आमचा कार्यक्रम पुढे ढकललाय अशी माहितीही मेटे यांनी दिली.