Vilasrao Deshmukh Videos in Marathi

VIDEO : अण्णांसोबत यशस्वी चर्चा, विलासराव देशमुखांनंतर फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री!

व्हिडीओFeb 5, 2019

VIDEO : अण्णांसोबत यशस्वी चर्चा, विलासराव देशमुखांनंतर फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री!

05 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अण्णांनी आपलं उपोषण सातव्या दिवशी मागे घेतलं आहे. अण्णांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळाचे ज्युस घेऊन मागे घेतलं. अण्णांनी आजपर्यंत दिल्ली ते राळेगणसिद्धीमध्ये अनेक वेळा आंदोलन केलं आहे. अण्णांना आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आजपर्यंत अनेक नेत्यांनी प्रयत्न केले पण यामध्ये काही मोजक्याच नेत्यांना यश आले. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहे, ज्यांनी अण्णांच्या आंदोलनामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. याआधी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आॅगस्ट 2011 मध्ये अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी यशस्वी मध्यस्थी केली होती. त्यानंतर अण्णांनी जेव्हा जेव्हा आंदोलनं केली, तेव्हाही विलासरावांनीच मध्यस्थी केली होती.

ताज्या बातम्या