News18 Lokmat

#vikhe patil

Showing of 66 - 79 from 197 results
VIDEO : 'त्याला आता माझ्यासमोर आणा', अजित पवार सुजय विखेंवर भडकले

व्हिडिओMar 15, 2019

VIDEO : 'त्याला आता माझ्यासमोर आणा', अजित पवार सुजय विखेंवर भडकले

15 मार्च : सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुजय विखेंना मी स्वत: राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितलं होतं. मात्र, ते स्वत:च नको म्हणाले असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. आणि हे खोटं निघालं तर वाट्टेल ते करायला तयार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसंच नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे अनेकदा तगादा लावला. मात्र, राष्ट्रवादीनं नगरची जागा न सोडल्यानं अखेर सुजय विखेंनी भाजपचा मार्ग धरल्याचा दावा स्वत: सुजय विखेंनी केला होता. मात्र, आता अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे या विषयाला नवं वळण मिळालं आहे.