12 जानेवारी : भंडारा इथल्या जनसंघर्ष यात्रेत बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. "बेवडे आहे का, जे विद्यार्थ्यांना अटक करण्याची भाषा करत आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. त्यांची ही मस्ती जनता उतरवेल, फक्त चार महिने थांबा", अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.