#vashi

VIDEO: मुंबईत येणाऱ्या दूधाच्या टॅंकरवर धाडी, 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त

मुंबईOct 17, 2018

VIDEO: मुंबईत येणाऱ्या दूधाच्या टॅंकरवर धाडी, 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त

मुंबई, 17 ऑक्टोबर : मुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरू झाली असून दुधातील भेसऴ रोखण्यासाठी दूध तपासण्यात येत आहे. वाशी, ठाणे, कल्याण अशा मुंबईच्या प्रवेशद्वारांवर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. दुधातील घटक हे नियमानुसार आहेत का याची तपासणी केली जात आहेत. रात्री 12 वाजेपर्यंत याअंतर्गत 6 हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवेश मार्गांवर पथके नेमली आहेत.अन्न आणि औषधी प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधावर धाडी टाकून 23 हजार लिटर दुध नष्ट केलं. या दुधापैकी 19 हजार लिटर दुधात युरियाच मोठं प्रमाण आढळलं. या प्रकरणी 5 जाणावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री मुंबइतल्या 5 टोल नाक्यावर कारवाई करून 227 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात असलेलं 9 लाख 22 हजार लिटर दुधाची नमुने घेण्यात आले त्यात 3 हजार 444 लिटर दुधात फॅट नसल्याचं समोर आलं तर धक्कादायक म्हणजे तब्बल 19 हजार 200 लिटर दुधात युरिया आढळून आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close