#valentines day

Showing of 27 - 40 from 69 results
Valentine's Day डोक्यावर, पठ्याने तिच्यासाठी केली 17 लाखांची चोरी

महाराष्ट्रFeb 11, 2019

Valentine's Day डोक्यावर, पठ्याने तिच्यासाठी केली 17 लाखांची चोरी

वैभव सोनावणे, पुणे, 11 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे आणि प्रत्येक जण आपल्या आवडत्या माणसासाठी काहीतरी छान गिफ्ट वगैरे घेण्याचा विचार करत असेल. पण, पुण्यामध्ये प्रेयसीसाठी प्रियकरानं तब्बल 17 लाखांची चोरी केली. हुक्या उर्फ श्रीकांत गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्यानं प्रेयसीवर खर्च करण्यासाठी ही चोरी केल्याचं कबूल केले आहे. या 22 वर्ष श्रीकांतसह त्याच्या इतरही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४०२ ग्रॅम सोने, ५ ग्रॅम चांदी, ११ दुचाकी असा १७ लाख १६ हजार २१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.