Uttar Pradesh

Showing of 651 - 664 from 760 results
धक्कादायक VIDEO: गावकऱ्यांनी या व्यक्तीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण, कारण...

देशJan 3, 2019

धक्कादायक VIDEO: गावकऱ्यांनी या व्यक्तीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण, कारण...

लखनौ, 3 जानेवारी : घरातील जनावरांची चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर इथं घडली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोराला गावकऱ्यांनी पकडलं. त्यानंतर झाडाला बांधून बराच वेळ चपलांनी मारहाण केली. या मारहाणीत चोर अर्धमेला झाल्याचे पाहून गावकरी तिथून निघून गेले. घटना घडल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनीच जखमी चोराला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते. हा सर्व प्रकार मलपुरा भागातील असून कायदा हातात घेतलेल्यांविरुद्ध पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.

ताज्या बातम्या