#uses

VIDEO : पश्चिम रेल्वेचे पोलीस 'सेग्वे स्कुटर'वर स्वार

व्हिडिओJan 27, 2019

VIDEO : पश्चिम रेल्वेचे पोलीस 'सेग्वे स्कुटर'वर स्वार

मुंबई, 27 जानेवारी : मुंबईची 'लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे प्रशासनानं प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलंय. आता पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरक्षेसाठी 'सेग्वे' ही इलेक्ट्रिकल स्कुटर वापरली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वे मार्गावर 6 'सेग्वे स्कुटर' दाखल झाल्या आहेत. चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली आणि वांद्रे या जास्त रहदारीच्या स्थानकांवर रेल्वे पोलीस या अत्याधुनिक इलेक्ट्रीक बाईकचा वापर करणार आहेत. येत्या काही दिवसात पश्चिम रेल्वेच्या सेवेत आणखी 5 सेग्वे दाखल होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून मरिन ड्राईव्हवर गस्त घालण्यासाठी अशाच 'सेग्वे स्कुटर'चा वापर केला जात आहे.