#us

VIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण!

बातम्याSep 17, 2018

VIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण!

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया 81 पैशांनी घसरला आहे. एका डॉलरसाठी आता 72 रुपये 65 पैसे मोजावे लागणार आहेत. आज सकाळी बाजार उघडल्यावर रुपयाची घसरण झाली. फॉरेक्स मार्केटमध्ये सध्या अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारयुद्धामुळे चिंता आहे. त्याचबरोबर, सेन्सेक्समध्ये सकाळी 367 अंकांची घसरण पहायला मिळाली, तर निफ्टीही 110 अंकांनी खाली आला. आंतरराष्ट्रीय बाजारात एकंदरच नकारात्मक वातावरण असल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही झाला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण झाल्याचं बोललं जातंय.

Live TV

News18 Lokmat
close