Upsc

Showing of 53 - 66 from 80 results
UPSC Topper सृष्टी देशमुख सांगतेय, तिच्या यशाचं रहस्य

बातम्याApr 5, 2019

UPSC Topper सृष्टी देशमुख सांगतेय, तिच्या यशाचं रहस्य

जितेंद्र शर्मा भोपाळ, 5 एप्रिल : UPSC परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली सृष्टी जयंत देशमुख मूळची मराठी असली, तरी सध्या भोपाळला राहते. News18 ने तिच्या भोपाळच्या घरी जाऊन संवाद साधला. "संपूर्ण देशात पाचवी रँक मिळाली आणि मुलींमध्ये पहिली आले, याचा आनंद आहे. महिलांविषयी काही काम करायची इच्छा आहे", असं ती म्हणाली. सृष्टीने खूप मेहनतीने अभ्यास केला, प्रलोभनांपासून दूर राहिले, हेच तिचं यश असल्याचं वडिलांनी सांगितलं. तर सोशल मीडियापासून आपण जाणीवपूर्वक दूर राहिल्याचंही सृष्टीने एका मुलाखतीत सांगितलं. तिचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे, असं आईनं सांगितलं.

ताज्या बातम्या