#ulhasnagar

Showing of 27 - 40 from 49 results
VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

व्हिडिओAug 28, 2018

VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर,28 आॅगस्ट : मधील खेमाणी परिसरात लघुशंका करण्याच्या वादातून एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटनासमोर आली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. हा सर्व प्रकार उल्हासनगर कॅम्प नंबर दोन, खेमाणी परिसरात असलेल्या एस व्ही एस हायस्कूलजवळ घडला. या घटनेत चंद्रकांत मोरे या युवकाची हत्या झाली. चंद्रकांत हा चायनिज खाण्यासाठी घरा बाहेर गेला असता काही अज्ञात तरुणांसोबत लघुशंका करण्याच्या वादात हा प्रकार घडला. त्यात चंद्रकांत मोरे ह्या तरुणावर तीन जणांनी धारधार हत्याराने वार केले आणि तेथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईला पाठवण्याचा सल्ला दिला त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत रवी जैस्वार याला पोलिसांनी अटक केली असून उल्हासनगर पोलीस इतर आरोपींचा तपास करत आहेत.