मुंबई, 30 नोव्हेंबर : मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तसेच पदभार स्वीकारताना उद्धव ठाकरेंनी भगव्या रंगाचा कुर्ता परीधान केला होता. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरांनी सूचक उत्तर दिलं आहे. हा भवगा रंग कोणत्याही लाँड्रीमध्ये धुतला जाऊ शकणार नाह, अशा शब्दात यावेळी उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. त्यामुळे हा भाजपसाठी टोला होता अशा चर्चांना उधाण आलं आहे.