बुलढाणा, 27 डिसेंबर : नांदुरा रेल्वे स्थानकावर एक दारूडा व्यक्ती रेल्वे रूळावर आत्महत्या करण्याच्या हेतूने रेल्वे रूळावर झोपला होता आणि समोरून येणारी मालगाडी त्याच्या अंगावरून गेली. अचंबित करणारी बाब म्हणजे मालगाडी अंगावरून जाऊनदेखील त्याला साधं खरचटलंही नाही. दरम्यान हा सर्व प्रकार कॅमेऱ्य़ात कैद झाला आहे.