#train toilets

VIDEO : काँग्रेसचे नेते दीड तास अडकले रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये !

देशSep 12, 2018

VIDEO : काँग्रेसचे नेते दीड तास अडकले रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये !

भोपाळ : 'हम तूम एक कमरे में बंद हो जाय, और चाबी खो जाय' असं हे बाॅबी चित्रपटातील गाणं प्रत्यक्षात काँग्रेस नेत्याच्या बाबतीत घडलंय. पण गंमत म्हणजे काँग्रेसचे नेते चंद्रिका प्रसाद द्विवेदी हे एकटेच आणि तेही रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये अडकले होते. घडलेली हकीकत अशी की, काँग्रेसचे नेते चंद्रिका प्रसाद द्विवेदी हे शताब्दी एक्स्प्रेसने भोपाळ स्टेशनहून दिल्लीला जात होते. शौचालयासाठी ते रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये गेले पण दरवाजा जाम झाल्यामुळे ते आतमध्ये अडकले गेले. तब्बल दीड तास द्विवेदी हे रेल्वेच्या शौचालयात अडकले होते. सुदैवाने त्यांच्याकडे मोबाईल फोन होता. त्यांनी आपल्या मुलाला फोन करून आपण रेल्वेच्या टाॅयलेटमध्ये अडकलो अशी माहिती दिली. त्यांच्या मुलाने रेल्वे हेल्पलाईन नंबरवर फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी टाॅयलेटचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढलं. सुदैवाने द्विवेदी हे दिल्लीकडे जाणारी सर्वात प्रिमियम समजली जाणारी शताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यामुळे तेथील टाॅयलेटची सुविधा चांगली होती.