News18 Lokmat

#traffic police

VIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक

बातम्याJul 17, 2019

VIDEO: वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन; धिंगाणा करणाऱ्या दाम्पत्याला अटक

नवी दिल्ली, 17 जुलै: ट्रॅफिक पोलिसासोबत गैरवर्तणूक केल्या प्रकरणी दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील मायापुरी परिसरातील ही घटना असून यातील माधुरी आणि अनिल कुमार पांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. माजी सैनिक असल्याचा दावा या दोघांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता आणि त्याचा व्हिडिओही समोर आला होता. आता मात्र गैरवर्तन करणाऱ्या दाम्पत्यावर कारवाई करत अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.