#three

VIDEO : सापडलं तीन कोटींच्या जुन्या नोटांचं घबाड; चौघांना अटक

व्हिडिओFeb 11, 2019

VIDEO : सापडलं तीन कोटींच्या जुन्या नोटांचं घबाड; चौघांना अटक

नवसारी, 11 फेब्रुवारी : नोटबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा सापडण्याचं सत्र अजुनही संपलेलं नाही. गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातल्या उंडच गावात तब्बल 3 कोटींच्या जुन्या नोटांचं घबाड सापडलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत जुन्या नोटा बाळगणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे नवसारी गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.