#thirty first

Welcome 2019 : ऑकलँडमध्ये नयनरम्य आतषबाजी

व्हिडिओDec 31, 2018

Welcome 2019 : ऑकलँडमध्ये नयनरम्य आतषबाजी

ऑकलंड, 31 डिसेंबर : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. अशावेळी जगभरातच नवीन वर्षाच्या स्वागताची धूम सुरू झाली आहे. सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पसरला असून, काही देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागताला सुरूवात झाली आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागताला सुरुवात झाली असून, शहरातल्या स्काय टॉवरवरून फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात येत आहे. 328 मीटर उंच असलेल्या या स्काय टॉवरवरून ही आतषबाजी केली जात आहे. बारा वाजायला काही क्षण राहिलेले असताना काऊंटडाऊन सुरू झालं होतं. बारा वाजताच स्काय टॉवरवर डोळ्यांचं पारणं फेडणारी आतषबाजी सुरू झाली. ही आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून, एकमेकांना आलिंगन देऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Live TV

News18 Lokmat
close