#tata

VIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का

महाराष्ट्रNov 17, 2018

VIDEO : राज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा धक्का

नाशिक, 17 नोव्हेंबर : नाशिकमध्ये राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बोटॅनिकल गार्डनमधला लेझर शो आता कायमचाच बंद होण्याच्या मार्गावर आहे. एक वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे हा लेझर शो बंद आहे. दुरुस्तीसाठी लागणारे 5 लाख रुपये वन विभागाला देणं शक्य नसल्याने हा लेझर शो आता अखेरचा घटका मोजत आहे. जल, जंगल, वनसंपदा याबाबत जनजागृती करणारा हा लेझर शो होता. उद्योगपती रतन टाटा यांनी स्वतः लक्ष घालून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला होता.