#suspended

तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग

व्हिडिओOct 15, 2018

तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग

मुंबई, १५ ऑक्टोबर २०१८- तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे जबरदस्तीनं उतरवल्याचा धक्कादायक प्रकार जुहूच्या एसएनडीटी वसतिगृहात घडलाय. स्लिव्हलेस आणि तोकडे कपडे घातले म्हणून वॉर्डननं या विद्यार्थिनीला एका खोलीत नेले आणि तिचे कपडे काढले. या विरोधात विद्यार्थिनींनी वॉर्डनविरुद्ध कारवाईची मागणी करत वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेरच आंदोलन केलं. यानंतर वॉर्डन रचना झवेरीविरुद्ध सांताक्रुझ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तर विद्यापीठ प्रशासनानं झवेरी यांच्यावर ४ दिवसांच्या निलंबनाची कारवाई केली.