नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांचं पार्थिव सकाळी 11 वाजता सुषमा स्वराज यांचं पार्थिव जंतर-मंतर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता यानंतर स्वराज यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवलं जाईल. दुपारी 4 वाजता लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.