अहमदनगर, 1 नोव्हेंबर : आज सकाळी साडेआठ वाजता अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून मराठवाड्यासाठी अखेर पाणी सोडण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास सुरूवातीला मोठा विरोध झाला. रस्त्यावरच्या लढाईसोबत सुप्रीम कोर्टातही पाणी सोडण्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला होता. मात्र कोर्टाने याचिका रद्द केली आणि रस्त्यावरची आंदोलनही थांबली. त्यामुळे अखेर आज अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी मराठवाड्याच्या दिशेने निघालं आहे