Sugarcane Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 46 results
VIDEO : कोल्हापूर जिल्ह्यात जंगली हत्तीचा धुमाकूळ

व्हिडीओDec 4, 2018

VIDEO : कोल्हापूर जिल्ह्यात जंगली हत्तीचा धुमाकूळ

कोल्हापूर, 4 डिसेंबर : जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा भागात जंगली हत्तीनं धुमाकूळ घातलाय. गेल्या महिन्याभरापासून जंगली हत्ती पिकांचं नुकसान करत आहे. त्याबाबत वन खातं कुठलीही कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलीय. कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर अनुस्कुरा गाव आहे. याच गावाशेजारील सगळ्या पिकांची नासधूस या हत्तीकडून सुरू आहे. दिवसाढवळ्या एका गावातील रस्ता ओलांडणाऱ्या हत्तीने नारळीची झाडे , ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. सध्या ऊसतोड गरजेची असतानाही या भागात ऊस तोडणीसाठी मजूर येण्यास नसल्यांच दिसून येत आहे. या हत्तीचा बंदोबस्त केला नाही तर हजारो टन ऊस शिवारात पडून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच महिलादेखील शेती शिवारामध्ये जाण्यास घाबरत असून हत्ती कुठुन कधी येईल याचा अंदाज नसल्याने शेती शिवार ओस पडत चालली आहेत. वनविभागाचे कर्मचारी येतात आणि निघून जातात; पण कुठलीही कारवाई करत नाहीत, असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे. तानसा नदी ओलांडून आलेल्या या हत्तीने गेल्याच आठवड्यात मनोहर पाटील यांच्या शेतातील बैलगाडी चक्काचूर केली होती. त्यातच काल सकाळपासून पुन्हा एकदा या भागात हत्तीनं धुमाकूळ घातल्याने त्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या