मुंबई, 15 जून : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सायकलस्वारी केली खरी मात्र त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी देशमुखांनी सायकलस्वारी केली. पण त्यांच्या मागेपुढे गाड्यांचा ताफा होता. त्यामुळे देशमुखांनी पर्यावरण जगजागृतीचा आव आणल्याची टीका ट्रोलर्सनी केली.