Songs Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 78 results
उदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'? पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रMar 3, 2019

उदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'? पाहा व्हिडिओ

सातारा, 3 मार्च : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा उदयनराजे यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. साताऱ्यात आयोजित एका कार्यक्रमात उदयनराजे यांनी गाणं गायलं आहे. तसंच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लोकांकडे पाहात 'I Love You So Much' असं उदयनराजे म्हणाले आहेत. यावेळी लोकांनीही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत त्यांना प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.