#smuggled

VIDEO : पुण्यात विकणार होते 'ते' दुर्मिळ खवल्या मांजर

व्हिडिओJan 30, 2019

VIDEO : पुण्यात विकणार होते 'ते' दुर्मिळ खवल्या मांजर

पुणे, 30 जानेवारी : पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून, हे खवले मांजर कुठून आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणलं याचा तपास पोलीस घेताहेत. कात्रज भागात चार ते पाच जण दुर्मिळ वन्यजीव असलेले खवले मांजर विक्री करता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे, अरुण कुसाळकर अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कारची तपासणी केली असता, कारच्या डीक्कीमध्ये एका पोत्यात हा प्राणी आढळून आला. या तिघांकडे विचारणा केली असता 70 लाख किमतीचा हा वन्यजीव खवले मांजर विक्री करण्याकरता आणले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हे खवले मांजर वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले असून, आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.