Sister Videos in Marathi

VIDEO : हॉस्टेलमध्ये ठेवते सांगत केला चिमुकल्या बहिण-भावांचा सौदा

व्हिडीओFeb 10, 2019

VIDEO : हॉस्टेलमध्ये ठेवते सांगत केला चिमुकल्या बहिण-भावांचा सौदा

बीड, 10 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशातील दोन लहान मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवत असल्याचं सांगत शेजारीच्या महिलेने त्यांचा लाखात सौदा केल्याचा कट उघड झालाय. या मुलांनी घरी सोडण्याचा हट्ट केला त्यावेळेस या महिलेने मुलांना अमानुष मारहाण करून त्यांना चटके दिलेत. मुलगी ही 8 वर्षाची तर मुलगा दहा वर्षाचा आहे. दोघेही मुळचे आंध्र प्रदेशचे राहणारे असुन, या महिलेनं हॉस्टेला ठेवते असे सांगत लातूरला आणले. 10 दिवस त्यामुलाकडुन क्रृरतेने वागून काम करवून घेतलं. त्यानंतर ती बाई विकणार असल्याचं मुलांना कळताचं त्यानी तेथून पळ काढला. बीडवरून त्यांनी परळी गाठलं. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या