Simba Videos in Marathi

VIDEO : ...तर मराठी माणसानं ओजळभर पाण्यात डुबुन मरावं -महेश मांजरेकर

व्हिडिओJan 3, 2019

VIDEO : ...तर मराठी माणसानं ओजळभर पाण्यात डुबुन मरावं -महेश मांजरेकर

मुंबई, 3 जानेवारी : मराठी चित्रपटांचा आलेख कितीही उंचावला असला तरी राज्यात सध्या मराठी चित्रपटांची परवड सुरुच असल्याचं दिसतंय. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला चक्क पुण्यात सिंगल स्क्रीन थिएटरही मिळत नाहीय. साध्या सिंगल स्क्रीनवर एक शो व्हावा यासाठीही झगडावं लागतंय. रणवीर सिंगच्या सिम्बा सिनेमाचे सगळे शो बूक आहेत. आणि सिम्बाच्या निर्मात्यांचा वितरकांवर दबाव आहे असा आरोप होतोय. एकीकडे प्रेक्षकांमध्ये भाई चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे थिएटर चालकांना 'भाई' हवाय अशी माहिती मिळतेय. दरम्यान, असंच चालू राहिलं तर सिनेमा बनवायचा की नाही ते सांगा असा संतप्त सवाल भाईचे निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलाय.

ताज्या बातम्या