#shivsena

Showing of 92 - 105 from 2500 results
VIDEO : ...आणि शेतकऱ्यांनी थांबवलं उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडिओDec 24, 2018

VIDEO : ...आणि शेतकऱ्यांनी थांबवलं उद्धव ठाकरेंचं भाषण

24 डिसेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूरमध्ये विराट सभा पार पडली. या सभेसाठी शिवसैनिकांसह स्थानिक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अचानक शेतकऱ्यांनी कांद्यावर बोलण्यासाठी मागणी केली. शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे उद्धव ठाकरे यांना भाषण थांबवावं लागलं. उद्धव ठाकरेंना आधी माईकचा आवाज पोहोचत नाही अशी शंका निर्माण झाली. व्यासपीठावरून त्यांनी आवाज येत नाही का? असा सवालही केला. तेव्हा काही शेतकऱ्यांनी उभं राहून कांदा-कांदा अशी घोषणा केली. तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या सेना नेत्यांनी कांद्यावर बोलण्यास सांगत आहे असं सांगितलं तेव्हा उद्धव यांनी, मी कांद्यावर बोलणारच आहे, आधी माझं हे बोलणं संपवू द्या, तुम्ही कांदा राखून ठेवा, आधी यांचा वांदा करू द्या, जेव्हा हे बेशुद्ध पडतील तेव्हा त्यांच्या नाकाला कांदा लावू असा टोला लगावताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Live TV

News18 Lokmat
close