#security guard

VIDEO : 'मीच माफी मागतो', राहुल गांधींना 'असा' सोडवला सुरक्षारक्षक-पायलटमध्ये झालेला वाद

बातम्याApr 28, 2019

VIDEO : 'मीच माफी मागतो', राहुल गांधींना 'असा' सोडवला सुरक्षारक्षक-पायलटमध्ये झालेला वाद

नाशिक, 28 एप्रिल : नाशिकमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच नाशिक विमानतळावर त्यांचा पायलट आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला. उशीर झाला असतानाही सुरक्षारक्षक पुन्हा तपासणी करत असल्याने पायलटने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. दोघांमध्ये सुरू असलेला वाद तब्बल एक तास सुरू होता. त्यानंतर तिथे असलेल्या राहुल गांधींचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. माफी कुणी मागायची? या मुद्द्यावरून सुरक्षारक्षक आणि पायलटचा वाद सुरूच होता. अखेर राहुल गांधी यांनी 'मीच माफी मागतो' असं म्हणून वाद मिटवला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राहुल गांधींच्या या कृतीचं कौतुक करण्यात येत आहे.

Live TV

News18 Lokmat
close