मुंबई, 10 फेब्रुवारी: मुंबईतल्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत अभिमान सोहळा पार पडला. या अभिमान सोहळ्यात शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. तर जयंत पाटील कॅबिनेट मंत्री आहेत. या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या बॅचचे माजी विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांची प्रकट मुलाखत घेणार आली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील त्यांच्या शाळेतील अनेक आठवणींना उजाळा दिला.