Sc

Showing of 235 - 244 from 244 results
एससी,एसटी आरक्षण विधेयक या आठवड्यात मंजूर होणार ?

बातम्याDec 10, 2012

एससी,एसटी आरक्षण विधेयक या आठवड्यात मंजूर होणार ?

10 डिसेंबरराज्यसभेत एससी, एसटी आरक्षण विधेयक या आठवड्याच्या शेवटी सुधारणांसह मंजूर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तोडगा काढण्यासाठी हमीद अन्सारीनी घेतली सर्वपक्षीय बैठक घेतली. संसदेत एफडीआयची लढाई जिंकल्यानंतर आज सरकार SC आणि ST ना नोकरीत बढतीसाठी आरक्षण देण्याचं सुधारणा विधेयक रेटण्याचा प्रयत्न करतंय. विधेयक मांडत असताना आज राज्यसभेत गदारोळ झाला. त्यानंतर राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. हे विधेयक मंजूर करण्याची मागणी मायावतींनी केली होती. एफडीआयच्या मुद्यावर मायावतींनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर सरकार आता परतफेड करतंय, अशी चर्चा आहे. तर डाव्यांनीही या विधेयकाला पाठिंबा जाहीर केलाय. भाजपनं आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही, तर सरकारला संसदेत मदत करणार्‍या समाजवादी पार्टीनं मात्र या विधेयकाला विरोध केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading