सातारा, 29 जुलै: साताऱ्यात कास पठारावर आयोजित केलेल्या मोटार स्पीड रॅली स्पर्धेत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाग घेतला होता. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चित्तथरारक जिप्सी ड्रायव्हिंग सर्वाना पाहायला मिळालं. या रॅलीमध्ये 200 स्पोर्टस कार चालकांनी सहभाग घेतला होता. आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांची फोर बाय फोर जिप्सी व्हॅन या रॅलीमध्ये सहभागी होती. आ. शिवेंद्रराजे स्वतः जिप्सीचे ड्रायव्हिंग करत होते तर शेजारी बसलेल्या सौ. वेदांतिकाराजे भोसले त्यांना प्रोत्साहन देत होत्या. कास पठारावरील मोठमोठ्या खड्ड्यातून तसेच चिखल, दलदलीतून बिनधास्तपणे वेगात ही जिप्सी जात असताना अनेकजण अवाक झाले. आ. शिवेंद्रराजे यांच्या जिप्सी ड्रायव्हिंगने अनेकांनी भुवया उंचवल्या.