#sangli

Showing of 27 - 40 from 140 results
VIDEO : 19 बाय 8 फुटांच्या गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा

व्हिडिओJan 17, 2019

VIDEO : 19 बाय 8 फुटांच्या गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा

सांगली, 17 जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळयाची सुंदर कलाकृती एका गोधडीवर साकारण्यात आली आहे. तब्बल 20 हजार 888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19 बाय 8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा सांगलीच्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर यांनी साकारला आहे. राज्यभिषेकच्या पेंटिंग प्रमाणे हुबेहूब कलाकृती या गोधडी मध्ये रेखीव स्वरूपात साकारली आहे. ही गोधडी साकारण्यासाठी श्रुती दांडेकर यांना तब्बल दहा महिन्यांचा आणि 807 तासांचा कालावधी लागला. ही गोधडी 25 ते 27 जानेवारीदरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या 'इंडिया क्विल्ट फेस्टिवल'मध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close