जालना, 6 जानेवारी : 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान'चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या जालना इथल्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. आर्य समाज मंदिर इथं संभाजी भिडे यांची बैठक होणार आहे. गोंधळानंतर पोलिसांनी या मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या सर्व गोंधळामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं.