Home » Tag » Rohit Sharma » photogallery
rohit sharma

rohit sharma फोटो - Rohit Sharma Photos

    टीम इंडियाच्या वन-डे टीमच्या कॅप्टनपदासाठी सध्या रोहित शर्माचे (Rohit Shrma) नाव चर्चेत आहे. सध्या टी20 टीमचा कॅप्टन असलेल्या रोहितचा वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून देखील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं कॅप्टन म्हणून दुसऱ्याच मॅचमध्ये द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्ध धर्मशालामध्ये 2017 साली झालेल्या मॅचमध्ये रोहितनं पहिल्यांदा वन-डे टीमची कॅप्टनसी केली होती. त्यामध्ये त्याने 153 बॉलमध्ये 13 फोर आणि 12 सिक्ससह नाबाद 208 रन केले होते. वन-डे क्रिकेटमधील ते त्याचे तिसरे द्विशतक होते. रोहितनं आजवर 10 वन-डेमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली आहे. यामध्ये त्याने 8 वन-डेमध्ये विजय मिळवला असून त्याचा विजयाचा रेकॉर्ड 80 टक्के आहे. मुंबईकर रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 साली झाला असून तो सध्या 34 वर्षांचा आहे. रोहितनं 13 डिसेंबर 2015 रोजी रितिका सजदेहशी (Ritika Sajdeh) लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव सामिरा (Samaira Sharma) आहे.