गुना, 21 मे: मध्य प्रदेशातील गुना इथे सामान घेऊन जाणारी रिक्षा ओव्हरलोड झाल्यानं अपघात होता होता टळला आहे. रिक्षा ओव्हरलोड झाल्यानं काही काळ अर्धी हवेत होती, सुरुवातीला सगळ्यांना हा प्रकार स्टंट असल्याचं वाटत होतं मात्र खरी परिस्थिती लक्षात येताच रिक्षा चालकाला स्थानिकांनी मदत केल्यानं अनर्थ टळला.