सोलापूर 9 जानेवारी : खुल्या गटातल्या गरिबांना आरक्षण देताना दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सोलापूरात दिली. काही पक्ष यावर जनतेची दिशाभूल करत असल्याचा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. मंगळवारी लोकसभेन बहुमताने हे सवर्ण आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केलं होतं.