दिनेश केळुसकर, प्रतिनिधी रत्नागिरीतल्या खेडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने पाहायला मिळाली आहे. आदित्य ठाकरे आणि आमदार संजय कदम हे आमने-सामने आले आहेत. चिंचघर - तिसे रस्त्याच्या भूमिपूजनावेळी हा वाद झाला आहे. आदित्य ठाकरेंच्या आधीच आमदार संजय कदमांनी भूमिपूजन केलं. पोलिसांच्या बंदोबस्तात आदित्य ठाकरेंनी येऊन पुन्हा एकदा भूमिपूजन केलं. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकत्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता.