#ratnagiri

Showing of 53 - 66 from 159 results
SPECIAL REPORT : येवा कोंकण आपलोच आसा, जिथे मगरीचे गाव आसा!

महाराष्ट्रJan 12, 2019

SPECIAL REPORT : येवा कोंकण आपलोच आसा, जिथे मगरीचे गाव आसा!

स्वप्नील घाग, 12 जानेवारी : मगर म्हटलं की, भल्या-भल्यांच्या अंगाला घाम फुटतो..खरं तर लोक मगरींपासून चार हात दूर राहाणं पसंत करतात. पण कोकणातील या मगरी पर्यटकांचं आकर्षण ठरल्या आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लगत असलेल्या वाशिष्ठीच्या तीरावर मुक्तपणे फिरणाऱ्या मगरी पाहण्यासाठी पर्यटकांप्रमाणेच स्थानिकही मोठी गर्दी करू लागले आहेत. चिपळूणच्या डोंगराळ भागात असलेल्या मालदोली गावातील खाडीमध्ये मगरींचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मगरींचं गाव म्हणून ओळख निर्माण झालेल्या मालदोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे.