बीड 4 जानेवारी : शिवसेनेला सोबत घेण्याची आमची पहिल्या दिवसांपासूनच इच्छा आहे आणि पुढेही राहिल. आमच्या मनात शंका नाही. आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू असं मत भाजपचे प्रदेशाध्य रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर भाजप निवडणुकीची जोरदार तयारी करत असून 48 पैकी 36 मतदार संघाचा दौरा पूर्ण केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.