13 मार्च : शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंमधल्या वादामुळे जालन्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. खोतकरांच्या प्रचंड विरोधानंतरही दानवेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. मराठवाड्यात समन्वयाची जबाबदारी अर्जुन खोतकरांवर सोपवल्याचं कळतंय. मात्र, जालना मतदारसंघ भाजपला सुटल्याची माहिती केवळ मीडियावरच ऐकल्याचा म्हणत खोतकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर खोतकर हे 2 लाख मतांनी विजयी होतील पण त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे असं काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले आहे.