26 मार्च : निवडणुकीचं रण आता चांगलंच तापायला लागलं आहे. अशात नेत्यांच्या भाषणबाजीला ऊत आला असून, बोलण्याच्या नादात अनेक नेत्यांची जीभ घसरत असल्याचं दिसून येत आहे. पुलवामा हल्ल्याबाबत बोलताना बीडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ते चक्क दहशतवादी असं म्हणाले. असे अनेक वाचाळवीर आहेत ज्यांनी टीका करताना आपली पातळीच सोडली.