Ramdas Kadam Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 35 results
Special Report : नगरचा 'सत्तेचा पॅटर्न' नेमका आहे तरी कोणता?

व्हिडिओJan 2, 2019

Special Report : नगरचा 'सत्तेचा पॅटर्न' नेमका आहे तरी कोणता?

शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी भाजप-राष्ट्रवादीच्या नगरमधील सत्ता पॅटर्नबाबत मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला. ''नगरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे यांच्याशी बोललो होतो पण राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याऐवजी भाजपला पाठिंबा देऊन आपले खायचे दात वेगळे असल्याचं पुन्हा दाखवून दिलं'', अशी जळजळीत टीका कदमांनी केली आहे. तर, दुसरीकडे रामदास कदमांच्या या आरोपांना राष्ट्रवादीनेही लागलीच प्रत्युत्तर दिलं आहे.''युतीचा संसार नीट चालत नाही. म्हणूनच ते दुसरीकडे लक्ष देताहेत'', असा पलटवार नवाब मलिक यांनी केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही नगर पॅटर्नबाबत आपली बाजू मांडत शिवसेनेला उघड पाडण्याचा प्रयत्न केलाय. तर या सगळ्या आरोप प्रत्यारोपातच शरद पवारांनी भाजपला पांठिबा देणाऱ्या 18 नगरसेवकांवर कारवाईचे स्पष्ट संकेत नगर दौऱ्यात दिले आहेत. नगरचा सत्तेचा पॅटर्न नेमका आहे तरी कोणता? भाजप आणि राष्ट्रवादीची खरंच छुपी युती आहे काय? हे प्रश्न आत निर्माण झाले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading