#ram janmabhumi

VIDEO : उद्धव ठाकरे दर्शनासाठी राम जन्मभूमीत, आदित्य आणि रश्मी ठाकरेही सोबत

देशNov 25, 2018

VIDEO : उद्धव ठाकरे दर्शनासाठी राम जन्मभूमीत, आदित्य आणि रश्मी ठाकरेही सोबत

अयोध्या, 25 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह राम जन्मभूमीचं दर्शन घेतलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रवेशाचा नियोजित मार्ग बदलण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात उसळलेली गर्दी काहीशी आक्रमकदेखील झाली. त्यामुळे मग उद्धव ठाकरे यांना दुसऱ्या मार्गाने राम जन्मभूमी दर्शनासाठी पाठवण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शिवसैनिकही मोठया प्रमाणात अयोध्येत दाखल झाले आहेत. राम जन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली.उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे.