नागपूर, 21 डिसेंबर : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या घोषणेवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले. कर्जमाफीच्या घोषणेनंतर भाजपने सभात्याग केलं.