मुंबई, 7 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी दादर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत मोदींवर जोरदार तोंडसुख घेतलं. राज यांच्या टीकेला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ''राज ठाकरेंनी इतकी मेहनत जर स्वतःसाठी घेतली असती, तर दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती'', अशी प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिली. ''देश चालवतील नाहीतर खड्ड्यात घालतील, पण राहुल गांधींनाच पंतप्रधान बनवा असं राज म्हणाले. सव्वाशे कोटींचा देश आहे हा, मनसे आहे का खड्ड्यात घालायला? ही कुठली भाषा आहे?'', असा सवाल तावडेंनी केला. ''स्वतःचं बंद पडलेलं इंजिन दुसऱ्याला लावून चालवण्याचा ते प्रयत्न करत आहेत'', असंही तावडे म्हणाले.