#railway station

Showing of 40 - 53 from 99 results
VIDEO : दारूची तस्करी करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी केली सिनेस्टाईल अटक

व्हिडिओNov 30, 2018

VIDEO : दारूची तस्करी करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी केली सिनेस्टाईल अटक

नागपूर, 30 नोव्हेंबर : नागपूर रेल्वे स्थानकावर दारूची तस्करी करणाऱ्या एका चोरट्याला रेल्वे पोलिसांनी सिनेस्टाईल अटक केलीय. नागपूर रेल्वे स्थानकावर लागलेल्या सर्व सिसिटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा घटनाक्रम कैद झालाय. 'दक्षिण एक्सप्रे'स प्लॅटफॉर्मवर उभी असताना, रोशन ढेनगले नामक व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी बॅगमध्ये काय आहे याची विचारणा केली. मात्र, उत्तर काहीही ना देता ती बॅग पोलिसांच्या अंगावार फेकून त्याने पळ काढला. मात्र, सिनेस्टाईल पाठलाग करत रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 6 हजार 242 रुपये किंमतीच्या दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.