#railway station

Showing of 1 - 14 from 84 results
VIDEO परळी रेल्वे स्थानकात थरार, एका मनोरुग्णाने घेतला रेल्वे इंजिनचा ताबा

बातम्याJun 25, 2019

VIDEO परळी रेल्वे स्थानकात थरार, एका मनोरुग्णाने घेतला रेल्वे इंजिनचा ताबा

सुरेश जाधव, परळी 25 जून : मराठवाड्यातल्या परळी रेल्वे स्थानकात आज थरार घडला. परळीहून अकोल्याला जाणाऱ्या रेल्वे इंजिनचा ताबा एका मनोरुग्णाने घेतल्याने खळबळ उडाली. ही गाडी फलाटावर उभी असताना हा माणूस इंजिनमध्ये जाऊन बसला. ही घटना समजल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. गाडीचा ड्रायव्हर येऊन त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र त्याला यश येत नव्हतं. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्या मनोरुग्णाला बाहेर काढण्यात यश आलं. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

Live TV

News18 Lokmat
close