#quotes

Showing of 248 - 256 from 256 results
गप्पा नौदल अभ्यासक डॉ.दत्तात्रय केतकरांशी : भाग 2

महाराष्ट्रDec 4, 2008

गप्पा नौदल अभ्यासक डॉ.दत्तात्रय केतकरांशी : भाग 2

4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. 1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून आपण नेव्ही डे साजरा करतो. त्यानिमित्ताने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये भारतीय नौदल अभ्यासक डॉ.दत्तात्रय केतकर आले होते. डॉ.दत्तात्रय केतकर हे आय.आय.टी पवईमध्ये 1963 ते 2000 या काळात मेटलर्जीचे प्राध्यापक होते. रिटायरमेंटनंतर त्यांनी भारतीय आरमाराचा अभ्यास केला. सरखेल कान्होजी आंग्रे,मराठा आरमार हे त्यांचं आरमारावरंचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्यांच्याशी त्यांच्या लिखाणाबद्दल, मराठा आणि एकूणच भारतीय आरमाराच्या इतिहासाबद्दल ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये चर्चा करण्यात आली. नौदल अभ्यासाविषयी डॉ. केतकर सांगतात, " मला पहिल्यापासूनच इतिहासाची आवड होती. इतिहास वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की खासकरून नौदलाविषयी फारसं कोणी लिहिलेलं नाहीये. त्सामुळे मी नौदल हा विषय घेऊन त्यावर अभ्यास करायला सुरुवात केली." भारताच्या नौदल इतिहासाविषयी डॉ. केतकर सांगतात, " भारतात समुद्रीमार्गे जे युरोपियन आले त्यात सर्वत आधी पोतुगीज आले. पोर्तुगीजांनी साधारण 1508मध्ये भारतात जेवढीजेवढी म्हणून आरमारं होती, त्या सगळ्यांचा पराभव केला. भारतापासून एडनपर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य पसरवलं होतं. त्यामुळे काय व्हायचं आपल्याला सागरी मार्गाने जायचं असल्यास त्यांची परवानगी घ्यावी लागायची. त्या परवापनीला ते कार्टाज म्हणायचे. आपल्याला सागरी व्यवराहाराचा कार्टाज मिळवावा लागायचा. त्या कार्टाजसाठी ठराविक रक्कमही भरावी लागायची. शिवाजी महाराजांकडेही राज्यस्थापनेनंतर काहीवर्षं कार्टाज घेजली होती. साधं मीठ जरी एका बंदरातून दुस-या बंदरात घेऊन जायचं असेल तर आपल्याला पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची. पोर्तुगीजांच्या धाडसी वृत्तीमुळे ते नौदलावर वर्चस्व मिळवू शकले होते. हेच शिवाजी महाराजांनी अचूक हेरून त्यांनी आपलं आरमार बळकटह केलं. " सलाम महाराष्ट्रमध्ये डॉ. केतकरांनी 1971 युद्धातली नौदलाची कामगिरी, विशाखापट्टणमवरचा हल्ला, कराची बंदरावरचा यशस्वी हल्ला, पूर्व पाकमधल्या नेव्हीचं उच्चाटन, 19 व्या शतकातली जहाजबांधणीविषयी त्यांनी माहिती त्यांनी सांगितली. भारतीय नौदल आणि भारतीय कोस्टलाईनवरची सुविधा अधिक सक्षम करायची असेल तर समुद्रकिल्ले, समुद्र चौक्यांवरची सुरक्षा बळकट करण्याचा सल्ला दिला. भारतीय नौदलाच्या इतिहासाविषयी डॉ. दत्तात्रय केतकरांनी सांगितलेली माहिती व्हिडिओवर बघता येईल.